Posts

रसिक

Image
रसीक होतो प्रिये, अन् आजही आहे तुझा हक्क या ह्रदयावर, आजही आहे तुझा मंद मंद लाजने, लाजतानाही बहरने खट्याळ अन् आवडता, छंद आहे तुझा मी न माझा राहतो, पाहता तुझा इशारा असा जालीम नयनांचा, बाण आहे तुझा गर्व होई डोळा, पाहता रूप तुझे देखणे असा अभिमानी सखे, प्रियकर आहे तुझा मिळतील घरी तुझ्या, शब्द माझ्या गझलेचे मग सांग "त्याला", गझलकार रसिक आहे तुझा सुनिल खोगरे 8983490090

स्त्री

जगद्जननी तू जगद्पालिनी सुखकारिणी तू दुःखहरिणी तू दुर्गा तू सरस्वती तूच विद्या तूच शक्ती तुझ्यात वसते अदम्य साहस अलौकिक भक्ती धैर्यशील तू धरेसम तेजोमय तू सुर्यासम निर्मल तू गंगेपरी प्रेम तुझे अथांग सागरी ऋणी तुझे हे ब्रह्मांड नमन तुला हे भगिनी हे माते हे अंबे जगदंबे ©सुनिल खोगरे

शपथ

मुकलो जरी दर्शनाला विचारांना तुमच्या मुकणार नाही चालू तुमच्या आदर्शांवर उपदेश तुमचे विसरणार नाही मोडला जरी कणा विकृतींपुढे कधी झुकणार नाही श्वास असेपर्यंत हृदयात स्मृती तुमच्या विझनार नाहीत मावळे आहोत तुमचे एकता आमची भंगणार नाही "शपथ घेतो स्वराज्याची" आपसात कधी लढणार नाही आपसात कधी लढणार नाही जय जिजाऊ जय शिवराय!!! ©सुनिल खोगरे (radheya.blogger@gmail.com) (8793490090)