स्त्री

जगद्जननी तू जगद्पालिनी
सुखकारिणी तू दुःखहरिणी
तू दुर्गा तू सरस्वती
तूच विद्या तूच शक्ती
तुझ्यात वसते
अदम्य साहस अलौकिक भक्ती
धैर्यशील तू धरेसम
तेजोमय तू सुर्यासम
निर्मल तू गंगेपरी
प्रेम तुझे अथांग सागरी
ऋणी तुझे हे ब्रह्मांड
नमन तुला हे भगिनी हे माते
हे अंबे जगदंबे

©सुनिल खोगरे

Comments

Popular posts from this blog

रसिक